Share

‘नितेशजी, सावध राहा! ‘हे’ लोक कधी तुमच्या घरात घुसतील कळणारही नाही’, मलिकांचा सूचक इशारा

Published On: 

मुंबई : क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्स पार्टीतील एनसीबीच्या छाप्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह अनेकांना अटक केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी जहरी टीका केली होती. ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिक इतके ओरडत आहेत का? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नितेश राणे, माझा तुम्हाला सल्ला आहे. असे कुणाला फ्रेम करू नका. सावध राहा. हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील हे तुम्हाला कळणारही नाही, असा सूचक इशारा मलिक यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना दिला आहे.

ते म्हणाले, ‘नितेश राणे जे बोलत आहेत ती हीच तर कारणे आहेत त्यांना फसवण्याची. मला वाटते भाजपने हे सर्व फ्रेम केले आहे. भाजप नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यातून हे सिद्ध होत आहे. मी नितेश राणेंना सल्ला देतो. सावध राहा. कधी तुमच्या घरात कुणी घुसेल आणि तुमचेच लोकं तुरुंगात जातील हे कळणारही नाही. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे’.

काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणे यांनी ट्विट केले होते की, ‘नवाब मलिक इतके ओरडत का आहेत? कारण तो खान आहे !! आणि सुशांत सिंह राजपूत नाही? फक्त त्याचे नाव खान असल्यामुळे तो बळी पडला? आणि कारण सुशांत हिंदू होता तो ड्रग अॅडिक्ट झाला ??’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नितेश राणे यांनी या घटनेचा संबंध सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी जोडत त्याला धर्माचा रंग दिला आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!