Share

‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांचा आरडाओरडा सुरुये का?; नितेश राणे संतापले

Published On: 

मुंबई : क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्स पार्टीतील एनसीबीच्या छाप्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह अनेकांना अटक केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी जहरी टीका केली आहे. ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिक इतके ओरडत आहेत का? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.

‘नवाब मलिक यांची आदळआपट का सुरू आहे, कारण तो खान आहे, सुशांत सिंह राजपूत नाही. तसेच खान नाव असल्यामुळे तो पीडित आहे का आणि सुशांत हिंदू होता, त्यामुळे तो ड्रग्ज अॅडिक्ट झाला का?’, अशी विचारणा नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.

दरम्यान, क्रूझ ड्रग्स प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली असून, आता एनसीबीने या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानच्या वाहन चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत खान कुटुंब किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची चौकशी झालेली नाही.

तर दुसरीकडे एनसीबीने ज्याला सोडले तो राष्ट्रवादीच्याच जवळचा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले, ”एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडले’ ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरंतर ज्या लोकांना सोडलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. तो क्लान असल्यामुळे मी त्याचं नाव घेत नाही. त्याचा सहभाग नसल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे’, असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!