मुंबई : मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागल्याचा आरोप भाजपकडून होतोय. शिवसेनेच्या ताब्यातील मनपा जाणीवपूर्वक याकडे लक्ष देत नसल्याने भाजपने मध्यंतरी आंदोलन केले होते. त्यांनतर आता मुंबईतल्या रस्त्यांच्या दुर्देशेवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी खरमरीत टीका करत ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून लोकांचा जीवघेणा प्रवास टाळा’, असा उपाहासात्मक सल्ला दिला आहे.
नितेश राणे यांनी पत्रात लिहिले आहे की, गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरानी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. अनेकांना या खड्ड्यांमुळे अपघात होऊन आपला आणि आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा.’
आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कॉंट्रक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो
सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊलं उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावरती उतरू असा इशारा नितेश राणेंनी महापौर पेडणेकर यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
