🕒 1 min read
मुंबई : मागील दीड वर्ष्यापासून संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला आता संपूर्ण जनमानस त्रस्त झालेले आहेत. हा कोरोना विषाणू कुठून आला ? कसा निर्माण झाला? याबाबत अनेक दावे गेले अनेक दिवस केले जात होते. कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा केला जातोय.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, ब्रिटन आणि अन्य देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोविड-19 या रोगाच्या उत्पत्तीसंदर्भातल्या अभ्यासासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. हा विषाणू फैलावण्यास चीन कारणीभूत असल्याची शंका अमेरिकेने व्यक्त केली होती. अमेरिकेचे मागील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही कोरोना विषाणूचा उल्लेख चिनी विषाणू किंवा वुहान विषाणू असा करत होते. चीन जागतिक आरोग्य संघटनेला पूर्ण सहकार्य करत नसून, वुहान लॅबशी संदर्भातली माहिती चीनने लपवली आहे, असे आरोप ट्रम्प यांनी चीनवर केले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता.
परंतु आता चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये कोरोना विषाणू तयार केलाय. एका नव्या अभ्यासात हा खळबळजनक दावा करण्यात आलाय. चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजीनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन हा विषाणू वटवाघळापासून आल्याचं जगाचा समज होईल. मात्र, संपूर्ण जगातील मीडियामध्ये हा विषाणू वुहानच्या लॅबमध्येच निर्माण झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत.
याआधी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम कोरोना विषाणूशी संदर्भातल्या वस्तुस्थितीचा तपास करण्यासाठी वुहानला गेली होती. त्यावेळी या टीमने वुहान लॅबलाही भेट दिली होती. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं असं जाहीर केलं होतं, की वुहान लॅबमधून कोरोना विषाणू सगळीकडे पसरला असं म्हणण्यासाठी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
मात्र, आता अमेरिका आणि ब्रिटनकडून जागतिक आरोग्य संघटनेवर याबाबतच्या तपासासाठी दबाव टाकला जात आहे. डेली मेलने छापलेल्या बातमीनुसार हा अभ्यास ब्रिटिश प्रोफेसर एंगस डल्गलिश आणि नॉवेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी केलाय. या अभ्यासात त्यांनी म्हटलं आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापासून चीनमध्येच कोविड-19 विषामूवर रेट्रो-इंजिनिअरिंग सुरु असल्याचे पुरावे आहेत. मात्र, अनेक वृत्तसंस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. प्रोफेसर डल्गलिश हे लंडनमध्ये सेंट जॉर्ज विद्यापीठात कॅन्सर विज्ञानाचे प्राध्यापक आहेक. तर डॉ. सोरेनसेन हे एख व्हायरॉलॉजिस्ट आणि Immunor या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोनावरील व्हॅक्सिन तयार करत आहे.
दरम्यान चीनच्या वुहानमधील लॅबमध्ये जाणिवपूर्वक डाटा नष्ट करण्यात आला. तो लपवण्यात आला किंवा गायब करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या वैज्ञानिकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही गायब करण्यात आलं. अशावेळी डल्गलिश आणि सोरेनसेन लस बनवण्यासाठी कोरोना सॅम्पलचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांनी विषाणूमध्ये एक खास फिंगरप्रिंट शोधून काढला. हा प्रकार लॅबमध्ये व्हायरससोबत काही छेडछाड केल्यासच संभव असल्याचं त्यांचं मत आहे. या दोन्ही अभ्यासकांनी ही बाब जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सायंटिफिक जर्नलनी त्यांचा हा दावा मनावर घेतला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- ‘धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी राजकारणात आले!’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
