Share

बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या

Published On: 

बीड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत बागपिंपळगाव (ता. गेवराई) व जवळबन (ता. केज) येथे दोन शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. बागपिंपळगाव येथील रमेश नामदेव पिंगळे (३०) शेती करून उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्याकडे बँकेचे व खासगी सावकाराचे कर्ज होते.

बँक व खासगी सावकाराचा सततचा कर्ज मागणीचा तगादा होता. त्यांची आई नातेवाइकाकडे गावी गेलेली होती व वडील खासगी जागेवर वॉचमन म्हणून कामाला गेले होते. लहान मुलगा व पत्नी माहेरी गेले होते. त्यांनी घरातील पत्राच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी वडील घरी आल्यावर रमेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले.

दुसरी घटना जवळबन (ता. केज) येथे घडली. बाळासाहेब गोवर्धन घाडगे (३२) हे शेती करून उपजीविका भागवत होते. त्यांच्याकडे जिल्हा बँकेचे कर्ज होते. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने यंदा अपेक्षित उत्पन्न पदरात पडले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे व कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेतून त्यांनी टोकाची भूमिका घेत बाळासाहेब घाडगेंंच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. युसूफवडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!