Share

‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. देशात देखील अशीच परिस्थिती आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात  रेमडेसिवीर इंजेक्शनचा आधीच तुटवडा असताना केंद्र सरकारने इंजेक्शनच्या पुरवठय़ावरही निर्बंध आणले. केंद्र सरकारने दर दिवसाला रेमडेसिवीरचे केवळ 26 हजार वायल्स देण्याचे परिपत्रक काढले आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. यामुळे महाराष्ट्रात दररोज किमान 10 हजार रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार काहीही करायला तयार आहे. केंद्र सरकारच्या पायाही पडायला तयार आहे, असे उद्गार टोपे यांनी काढले.

केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठय़ाची यादी जाहीर केली आहे. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून राज्याला दररोज 36 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळायचे, परंतु आता कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचे याचे नियंत्रण केंद्राने स्वतःकडे ठेवले आहे. तसे परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले आहे. त्यानुसार आपल्याला दररोज 26 हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. यामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.’ रेमडेसिवीर व ऑक्सिजन उपलब्धतेच्या कोटय़ाचे वाटप केंद्र सरकारकडे आहे. रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्राला ते अधिक मिळावे. ऑक्सिजन पुरवठय़ासाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केंद्राला आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!