Share

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला ‘या’ कारणामुळे अटक

Published On: 

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या छोट्या पडद्यावरील टीव्ही अभिनेता करण मेहराला अटक करण्यात आली आहे. आपल्या पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री करण मेहराला अटक केली आहे. करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही माहिती समोर येताच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पण सोमवारी दोघांमध्ये वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला. त्यामुळे करण आणि निशामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात धरून करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

करण सात वर्ष ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. यात त्याने नैतिक सिंघानियाची भूमिका साकारली होती. शोमध्ये तो अभिनेत्री हिना खानसोबत दिसला होता. करण मेहरा या शोमधून प्रचंड लोकप्रिय झाला. सध्या या शोमध्ये मोहसीन खान आणि शिवांगी जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. करण मेहराने बिग बॉस १० मध्येही भाग घेतला होता. २०१२ साली निशा आणि करणचे लग्न झाले आणि  २०१७ मध्ये त्यांना मुलगा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!