🕒 1 min read
नवी-दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी भाष्य केले आहे. तसेच विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो, असेही यावेळी ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात काल(२३ जाने.) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रशांत किशोर म्हणाले की,’विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी मी मदत करु इच्छितो. तसेच ही आघाडी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करु शकते’, असेही प्रशांत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, पुढील महिन्यामध्ये पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल.’
दरम्यान, पुढे सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण सांगत प्रश्न किशोर म्हणाले की,’तुम्ही जर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा विचार केल्यास लोकसभेच्या जवळजवळ २०० जागा आहेत. तरी देखील भाजप येथे केवळ ५० च्या आसापासच जागा जिंकू शकला आहे. बाकी राहिलेल्या ३५० जागांपैकी भाजप कोणासाठी काहीच सोडत नाहीय,’ असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
- ‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजप आक्रमक; पुनम महाजन म्हणाल्या,“नामर्दांसारखे कार्टून…”
- ‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
- ‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
