🕒 1 min read
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाषणाचे समर्थन करत भाजपवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.
भाजप नेत्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’, अशी टीका पुनम यांनी केली आहे. तसेच या ट्विटसह त्यांनी संजय राऊत ट्विटही रिट्विट केले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Pramod Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केले असून या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसेच बाजूला एक स्टूलही आहे. त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच हे व्यंगचित्र ट्विट केल्याच्या काही वेळानंतर राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
पूनम महाजन यांनी केलेल्या टिकेनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, मी व्यक्तिगत रित्या प्रमोद महाजनांवर टीका केली नाही. ते भाजपचे नेते होते. बाळासाहेब त्यांच्यावर प्रेम करायचे. पूनम आता कुठे आहेत मला माहीत नाही. भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकललं आहे. त्यामुळे भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात हे मी पूनम यांना विचारू इच्छितो, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
-
‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
-
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजप आक्रमक; पुनम महाजन म्हणाल्या,“नामर्दांसारखे कार्टून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
