अमरावती : शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले.
आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. प्रारंभी पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पूजन झाले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही 40 वारकऱ्यांना पालखीसह पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.
आषाढीवारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपुरात महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत. त्यामध्ये अमरावतीतील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणी मातेच्या पालखीचा समावेश आहे. pic.twitter.com/RBODiRwmnP
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 18, 2021
श्रीसंत सद्गुरू सदाराम महाराज यांनी इ. स. १५९४ साली सुरू केलेली व ४२७ वर्षांची परंपरा लाभलेली विदर्भ राजकन्या जगतजननी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी आहे. pic.twitter.com/PXPYAFm6r5
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 18, 2021
आज ही पालखी एसटी बसने निघते आहे , २० जुलैला एकादशीला श्रीक्षेत्र कौंडण्यपूर देवस्थानच्या वतीने पांडुरंगाला अहेर करून २१ जुलैला परतीचा प्रवास करणार आहे. रुक्मिणी मातेच्या पालखीने यावर्षी ४२७ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. pic.twitter.com/6IV2hLJnbA
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 18, 2021
आज रुख्मीणी मातेच्या पादुकांचा अभिषेक व प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहुन पालखीला पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ केले. pic.twitter.com/Ha7b5K41RQ
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 18, 2021
यावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाचरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली. हे पांडुरंगा शेतकऱ्यांचे भले होऊ दे, पाऊस पाणी होऊन शेती पिकू दे, कष्टकरी सुखावू दे आणि कोरोना महामारीचे संकट या पृथ्वीतलावरुन कायमचे नष्ट होऊ दे…असे साकडे त्यांनी याप्रसंगी घातले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, वीणा- मृदंगाचा ताल यामुळे कौंडण्यपुरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशीवृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पुजाताई आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही- अॅड. अनिल परब
- विठुरायाच्या पंढरीत कडक संचारबंदी लागू, बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही
- ‘एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक ; नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार’
- बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- कोरोनामुळे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर संथगतीने काम – जयदत्त क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

