Share

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही-  अॅड. अनिल परब

Published On: 

औरंगाबाद : केंद्रातल्या मोदी सरकारने केलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला दररोज दोन कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. जर अशाच प्रकारे डिझेल दरवाढ होत राहिली, तर जास्तीचा हा भार एसटीला पेलवणारा नाही. त्यामुळे आगामी काळात तिकीट दरवाढी शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे सुतोवाच परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी शुक्रवारी (दि.१६) औरंगाबादेत केले. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी अ‍ॅड. परब यांनी औरंगाबादेत भेट दिली. यावेळी एसटी महामंडळाच्या चिकलठाणा कार्यशाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितले, एसटी ही गरिबांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात एसटीला हजारो कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळेच एसटी पूर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. एसटीने यापुढे केवळ प्रवाशांवर अवलंबून न राहता उत्पन्नवाढीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून महाकार्गोच्या माध्यमातून मालवाहतूक सुरु केली आहे. या मालवाहतूक व्यवसायातून राज्य सरकारचा २५ टक्के व्यवसाय मिळणार आहे.

पुर्वी एसटीसाठी असलेले पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग प्रकल्प जनतेसाठी सुरु करण्यात येत आहेत. परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील, असा आशावाद अ‍ॅड. परब यांनी व्यक्त केला. नवीन बसेसची बांधणी आणि चेसीस घेवून देखील बसेसची बांधणी आम्हीच करणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे औरंगाबाद, नागपुर आणि दापोडीसारखी बस बांधणी कार्यशाळा आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. एसटीच्या ताफ्यातील साडेतीन हजार बसेस बाद होणार आहे. त्यामुळे नवीन बसेस भाड्याने घेण्याबरोबरच नवीन बसेसची बांधणीही केली जाणार आहे. यापूर्वीही बस भाड्याने घेतलेल्याच आहेत, मुळात प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे अ‍ॅड. परब यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!