Share

कोरोनामुळे मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर संथगतीने काम – जयदत्त क्षीरसागर

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी लिफ्ट करुन गोदावरी पात्रात सोडण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मंजूरी मिळालेली आहे. केवळ त्यासाठी नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीचा अहवाल येणे बाकी आहे. कोरोनामुळे या अहवालाचे काम संथगतीने सुरू आहे. लवकरच हा अहवाल प्राप्त होईल, त्यानंतर मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

मराठवाड्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणाची जेवढी साठवण क्षमता आहे, त्यापेक्षा जास्त पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी लिफ्ट करुन गोदावरी पात्रात सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अभ्यास समिती नेमली असली तरी कोरोनामुळे अहवाल येण्यास उशीर होत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी पात्रात सोडण्याच्या या प्रस्तावाला साधारण १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. हा पैसा कसा उभा करायचा, त्यामध्ये केंद्राचा सहभाग या सर्व बाबी दुसऱ्या टप्प्यात येतात. अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातला दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याला राज्य सरकारचे प्राध्यन्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!