नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला. या कायद्यांमुळे निर्माण झालेला पेच दूर करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
दरम्यान, या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी. एस. मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल घनवट यांचा समावेश करण्यात आला आहे.
For almost two months, we are suffering and dying in cold weather. The government is giving us 'tarikh pe tarikh' and are dragging things so that we get tired and leave the place. This is their conspiracy: Hannan Mollah, General Secretary, All India Kisan Sabha #FarmLaws pic.twitter.com/NU88y5EOaV
— ANI (@ANI) January 17, 2021
सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तूर्तास स्थगिती दिली असली तरी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन हे सुरु ठेवले आहे. हे कायदे कायमचेच रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत.
दरम्यान,अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘ आंदोलन सुरु होऊन दोन महिने झाले, गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी थंडीने कुडकुडत आहे मात्र सरकार फक्त ‘तारीख पे तारीख’ खेळून या आंदोलनबाबत निर्णय घेत नाही’ असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देण्याचा खेळ यासाठीच सुरु ठेवला आहे कारण शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत असा आरोप हन्नान मोल्ला यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बंदर क्या जाने अद्रक का स्वाद…पंतच्या सनग्लासेसवरून थट्टा करणाऱ्या समालोचकांवरच मिम्सचा पाऊस
- देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – वर्षा गायकवाड
- राज्यातच नाही तर देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणी आग्रही असू नये; राऊतांचा काँग्रेसला टोला
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे
- अर्थसंकल्पापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा केंद्र सरकारला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

