🕒 1 min read
मुंबई: कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याच मत नुकतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केल होत.
या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरु झाली असून यामध्ये अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या, पंतप्रधान मोदींनी अर्थशास्त्रज्ञांची बैठक घेतली. तर यावर्षी देशाच्या इतिहासात पहिले डीजीटल आणि पेपरलेस बजेट सदर करण्यात येणार आहे. तर यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना मल्टिप्लायर इफेक्ट आणि रिस्क फॅक्टर बद्दल सांगत आपले उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ घालण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. ते एका व्हर्क्चुअल कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या वर्षभरापासून अर्थव्यवस्था कोलमडली आहे मात्र या दरम्यान देखील शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठा पैसा आला. देशांतर्गत बाजारात वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे पण एक इक्विटी मध्ये गुंतवणूक अचानक बंद होऊ शकते. विदेशातून येणारा हा पैसा कमी ही होऊ शकतो यासाठी सरकारने उपाययोजना अाखायला हव्या अस त्यांनी सुचवले.
त्याच बरोबर सरकारी आणि खासगी बँकांनी आपले भागभांडवल वाढ वायला हवे, बॅलन्स शीट चांगली राखण्याचा प्रयत्न करून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योगदान द्यावं असे म्हटले. यावेळी त्यांनी कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी व्हावा यासाठी रिझर्व बँकेने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं देखील सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- छगन भुजबळ
- अर्जुन तेंडुलकरचे मुंबईकडून पदार्पण, इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने दिल्या खास शुभेच्छा
- ‘योगी माझ्या पेक्षा चांगले मुख्यमंत्री’; राजनाथ सिंहांची योगींवर स्तुतीसुमने…
- सोलापूर :अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्व द्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- केंद्र सरकारने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोनाची लस मोफत पुरवावी- राजेंद्र यड्रावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
