लखनऊ: राजकारणी लोकांचे राजकीय वाद नेहमीच समोर येत असतात मात्र त्याच बरोबर अगदी सामान्य लोकांप्रमाणेच त्यांच्या देखील कौटुंबिक कलह समोर येत असतात. यामध्ये आता उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार कौशल किशोर यांच्या घरातील कौटुंबिक वाद समोर आला आहे.
कौशल किशोर हे मोहनलालगंज मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. याच वादातून त्यांची सून अंकिता हिने टोकाचे पाऊल उचलले असून तिने कौशल किशोर यांच्या घराबाहेर येऊन स्वत:च्या हाताची नस कापली. यानंतर अंकिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
अंकिताने आपल्या पतीवर म्हणजे कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी अंकिताने एक व्हीडिओही शेअर केला होता. यामध्ये तिने मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. यानंतर अंकिता कौशल किशोर यांच्या दुबग्गा येथील घराबाहेर आली आणि हाताची नस कापून घेतली.
याच दरम्यान अंकिता हिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली असून यामध्ये तिने कौशल किशोर यांच्या मुलगा तिचा पती आरोप केले आहेत. मी कोणाशी लढू शकत नाही कारण, माझे वडील खासदार नाहीत आणि आई आमदार नाही. माझं कोणीही ऐकून घेणार नाही. मी आजपर्यंत कोणालाही तुला हात लावू दिला नाही. तर मी तुला कशी मारु शकते? तू किती खोटं बोलत आहेस. तू आणि तुझ्या घरच्यांनी मला मरण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवलेला नाही, असे अंकिताने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. घराचं भाडं भरलं नाही, गॅस लावला नाही, तू एकदाही विचार केला नाहीस मी काय खाणार? तू माझ्याकडे येणार नसशील तर मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. मी जातेय. मी तुझ्या लक्षात राहिलेच तर तुला समजेल की तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणीच केले नाही. माझ्या मृत्यूचे कारण तू आणि तुझ्या घरातील लोक आहेत, असेही अंकिताने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
- चहलचे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’


