Share

इंग्लंड दौऱ्यात उडानकटला वगळल्याने ‘या’ माजी क्रिकेटपटुने व्यक्त केली नाराजी; उडानकटने दिले ‘हे’ उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. या स्पर्धेनंतर बीसीसीआयने काही दिवसातच जागतीक कसोटी चॅम्पीयनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात जयदेव उडानकटला स्थान न दिल्याबद्दल माजी क्रिकेटपटु डोड्डा गणेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात उडाणकटला संधी न दिल्याने माजी भारतीय क्रिकेटपटु डोड्डा गणेश याने उनाडकटला न निवडल्याने नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘ भारतीय कसोटी संघात जागा मिळवण्यासाठी उनाडकटला अजून काय करावे लागेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करुनही त्याला वारंवार दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून अतिशय वाईट वाटत आहे.’ असे ते म्हणाले. गणेश यांच्या या ट्विटला उत्तर देताना जयदेव उडानकट म्हणाला की. ‘तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या काळजीने मला अजून जास्तच प्रोत्साहन मिळाले आहे. या नाही पण पुढील हंगामात मी नक्कीच पुनरागमन शक्य करेन’ असे म्हणत उडानकटने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

डिसेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र दुर्दैवाने हाच पदार्पणाचा कसोटी सामना त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. यानंतर त्याला एकदाही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यादरम्यान त्याने सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी केली आहे. जयदेवने आतापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळत त्याने ३२७ गडी बाद केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!