Share

ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गंत मुंबईत २७ मेट्रिक टन ऑक्सिजन कंटेनर दाखल, आदित्य ठाकरेंनी मानले आभार

Published On: 

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात विदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन समुद्र सेतू सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा याचा फायदा ऑक्सिजन पुरवठ्यासाठी होत आहे. या अंतर्गंत मुंबईच्या समुद्र किणाऱ्यावर २७ मेट्रिक टनाचे ऑक्सिजन कंटेनर दाखल झाले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देत या पहिल्या ऑक्सिजन टँकचे स्वागत केले.

या संबंधी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. मुंबईत नौदलाच्या तळावर आयएनएस त्रिकंड युध्दनौका दाखल झाली असून या माध्यमातून हे दोन कंटेनर भारतात आले आहेत. यामुळे कारोना संकटाच्या काळात कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये मदत मिळणार आहे.

ऑपरेशन समुद्र सेतू नौदलाच्या मदतीने राबवले जात आहे. यात फ्रान्सची मदत लाभली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी फ्रान्स आणि नौदलाचे आभार व्यक्त केले आहे. कोरोना संकटाच्या काळात जगभरातून भारताला मदत मिळत आहे. अनेक देशांनी औषधी, वैद्यकीय उपकरणे आणि कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले साहित्य भारताला मदत म्हणून पाठवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!