नायगाव – रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण संबंधी आंदोलन करण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सोमठाणा येथे आंदोलन करण्यात आले. माझे अंगण… आंदोलनाचे रणांगण या थीमच्या अंतर्गत अंगणात आंदोलन करण्यात आले.
काठीला शाळेचे दप्तर बांधून हे आंदोलन करून सरकारला सांगण्यात येत होतं की आमचा आरक्षण रद्द झाल्यामुळे आता आमच्या पोराबाळांच शिक्षणाचे भवितव्य अंधारात गेले असल्याकारणाने आता शाळेचे दप्तर आड्याला बांधण्याची वेळ आलेली आहे. मराठ्यांच्या पोरां-बाळाच आरक्षण बांधल काठीला….. महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला , महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध….., एक मराठा…. लाख मराठा अशा घोषणा देऊन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले की,मागच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास म्हणून आरक्षण दिले होते . उच्च न्यायालयात सुद्धा टीकले होते. या आरक्षणाचा राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाला पण सर्वोच्च न्यायालय मध्ये ही केस गेल्यानंतर महाविकास आघाडी मधले काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारने समाजाची बाजू व्यवस्थित मांडली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे,ही मराठ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व नोकरीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे , भविष्य अंधारात गेले आहे.
एकीकडे शेती परवडत नाही, दुसरीकडे शिक्षणात- नोकरीत संधी नाही, अशा द्विधा संकटात आज मराठा समाज सापडलेला आहे.पण प्रस्थापित मराठे जे आज सत्तेत आलेत ते विस्थापित म्हणजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार नाहीत हे यातून सिद्ध होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारचा आम्ही समस्त समाजाच्या,रयत क्रांती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो असं ते म्हणाले .
सरकारला विनंती करतो सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनश्चयाचिका दाखल करून गायकवाड समितीचा अहवाल योग्य ते पद्धतीने मांडून मराठा समाज सामाजिक आर्थिक दृष्ट्या कसा मागास आहे हे सिद्ध करावे आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे हीच विनंती.
सरकारने योग्य ते पावलं उचलले नाही तर मराठा समाजाचा मोठा उद्रेक राज्यात निर्माण होईल ,सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे समाज शांत आहे ,याचा अर्थ असा नाही की समाजामध्ये असंतोष नाही त्यामुळे सरकारने योग्य ते पाऊल उचलावे अन्यथा येणाऱ्या परिणामांना सामोरे जावे असा इशारा शिंदे यांनी दिला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष शहाजी पा. कदम, पांडुरंग पा. कदम ,उपसरपंच उत्तम देवदे , प्रकाश कदम ,शंकर पा कदम, सुदाम पा. कदम ,आकाश कदम, शंकर कोकलवाड ,अशोक श्रीरामवार, व्यंकट पा उमाटे ,विद्यार्थी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

