नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्येष्ठ, तरुण आणि मुलंही कोरोनाचे बळी ठरत आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. अशातच बॉलिवूडमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर वाढत आहे. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. या कोरोनामुळे सिनेसृष्टीतील काही कलाकारांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच आता अभिनेता राहुल व्होरा याचेही कोरोनाने निधन झाले असल्याचे समजत आहे.
राहुलने मृत्यूपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. राहुलने शनिवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो. मी लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता मी धैर्य गमावले आहे.’ यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनिष सिसोदिया यांनाही टॅग केलं होत.
उत्तराखंडचा असणारा राहुल ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होता. नेटफ्लिक्स वरील वेबसीरिज ‘फ्रीडम’मध्ये तो दिसला होता. राहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याची तब्येत अधिकच खालावली होती. पोस्ट लिहिल्यानंतर काही कालावधीत त्याने अखेरचा श्वास घेतला. या कारणामुळे आता आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- आयपीएलनंतर टी -20 वर्ल्ड कप देखील होणार स्थगित ? चॅपेल यांनी केले मोठे विधान
- वडिलांच्या निधनानंतर चेतन सकारियाच्या मदतीला धावली राजस्थान रॉयल्स; शक्य ती मदत करण्याचे दिले अश्वासन
- ‘मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे’, भावासाठी कामरान अकमल सरसावला पुढे
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

