🕒 1 min read
मुंबई : अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बाबत सोयीने विचार केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली.
या प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशात प्राथमिक तपासात आढळलेल्या गुन्ह्यांसदर्भात चौकशी करण्याचा सीबीआयला पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मा. उच्च न्यायालयाचा आदेश स्वतःच्या सोयीने वाचला असल्याने त्यांची अशी वक्तव्य येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत प्राथमिक चौकशीत जे आढळलं असेल, त्याप्रमाणे पुढील तपास करण्याचा अधिकार सीबीआयला आहे.’
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मा. उच्च न्यायालयाचा आदेश स्वतःच्या सोयीने वाचला असल्याने त्यांची अशी वक्तव्य येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत प्राथमिक चौकशीत जे आढळलं असेल, त्याप्रमाणे पुढील तपास करण्याचा अधिकार #CBI ला आहे.@BJP4Maharashtra pic.twitter.com/RNR4P7L3rL
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 24, 2021
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्या नंतर केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे दिला होता. मात्र, या आरोपामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद आणखीन वाढला आहे. एकाच वर्षानंतर महाविकास आघाडीमधील दुयाऱ्या नेत्याला राजीनामा देण्याची वेळ आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत; CBIच्या धाडीनंतर चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य
- कलाकारांच्या वागण्यावर अन्नु कपुर यांनी दर्शवली तिव्र नाराजी; ट्विट करत केले ‘हे’ अवाहन
- उस्मानाबादेत मोकाट फिरणाऱ्या ९० जणांची तपासणी; ४ जण कोरोना बाधीत
- राधेचा ट्रेलर पाहुन टायगर झाला दिशा पाटनीवर फिदा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत केले कौतुक
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

