🕒 1 min read
बुलडाणा : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले आहेत. या विधेयकांना देशभरातील शेतकर्यांमधून विरोध होत आहे. दरम्यान अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग यांनी २५ सप्टेंबर रोजी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याची हाक दिली होती. या आंदोलनाची पहिली ठिणगी बुलडाण्यात पडली. शुक्रवार, २४ सप्टेंबरच्या सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सावळा फाटा येथे पारित झालेल्या तीनही विधेयकांची होळी करून आपला रोष व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे कृषी विधेयकाची होळी पेटविणारा बहुदा हा देशातील पहिलाच बहाद्दूर म्हणावा लागेल
बुलडाणा ते नागपूर मार्गावरील सावळा फाटा येथे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकरीविरोधी विधेयकांची होळी करुन केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचा विचार न करता कॉपोर्रेट कंपन्यांचा विचार केला आहे. शेतकरी हिताला जागण्यापेक्षा धनदांडग्या उद्योगपतींना रान मोकळे करुन दिले जात आहे. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातून पळ काढीत आहे. शेतकर्यांना कॉपोर्रेट कंपन्याच्या दारात उभे करीत आहे, असा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.
प्रथम शेतकर्यांना सिंचन, विज व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या आणि मग त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा. या कायद्यानुसार जर कंपन्यांनी शेतकर्यांना फसविले तर त्याला जबाबदार कोण राहणार, जर कंपन्यांनी लॉबिंग करून शेतीमालाचे भाव पडले तर त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही. यामध्ये शेतकर्यांचेच नुकसान होणार आहे व कॉपोर्रेट कंपन्यांचा फायदा होईल, सदर विधेयके आणून केंद्र सरकारने शेतकर्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे. केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात राणा चंदन, पवन देशमुख, शे. रफिक शे. करीम, अनिल पडोळ, ज्ञानेश्वर कल्याणकर, दत्तात्रय जेऊघाले, रामेश्वर पवार, गोपाल जोशी, गणेश इंगोले, लवेश उबरहंडे, आकाश माळोदे, शेख रशीद, बबलू खान, मनोज जयस्वाल, शेख बाबू, इरफान शहा, शेख सोहेल,आसिफ खान यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- कर्जतच्या उपकारागृहातील एकाचवेळी २७ कैद्यांना कोरोनाची लागण
- प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी अन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी का होतेय हे पद भरण्याची मागणी
- शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना या पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत
- जिल्ह्यातील या आमदारांनी थेट बांधावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद
- नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरेंनी दिली अनिता पोपळघटांना संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
