🕒 1 min read
नांदुरा : मलकापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत निमखेड येथे २१ सप्टेंबर रोजी झालेल्याअतवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. मागील खरीप व रब्बी हंगाम अतवृष्टी व वादळी पावसामुळे वाया गेल्याने त्याच प्रमाणे मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मतदारसंघातील शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.
आणि आता अतीवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश एकडे यांनी निमखेड येथील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीबाबत थेट बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नुकसानी बाबत तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी सूचना प्रशासनास केली. तसेच निमखेड येथील विश्वगंगा नदीवर बंधारे झाल्यामूळे जवळा बाजार व टाकरखेड शिवारात जाण्यास नदी पात्रात पाणी जास्त असल्यामुळे शेतात जाता येत नाही ही गावकर्यांची मागणी लक्षात घेता आमदार राजेश एकडे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास सदर ठिकाणी पूलाचे बांधकाम बाबतचा सर्व्हे करून अहवाल सादर करण्याचा सूचना सुध्दा दिल्या. यावेळी मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील, गणपत पाटील, शेषराव पाटील, श्रीकृष्ण पाटील व गावकरी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठा समाजाच्या हितासाठी सर्वांना एकत्र यावेच लागेल – शिवेंद्रसिंहराजे भोसले
- नाशिक मध्ये मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक
- कर्जतच्या उपकारागृहातील एकाचवेळी २७ कैद्यांना कोरोनाची लागण
- प्रशासकीय अनागोंदी टाळण्यासाठी अन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी का होतेय हे पद भरण्याची मागणी
- शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना या पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
