Share

नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरेंनी दिली अनिता पोपळघटांना संधी

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. परंतु अवघ्या तीन वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने तनपुरे यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठविले. प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अखेर नगराध्यक्षपदी अनिता दशरथ पोपळघट यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संधी दिली आहे.

नगराध्यक्षपदी अनिता दशरथ पोपळघट यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत जाहीर केले. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट होते.

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पालिकेतील गटनेत्या डॉ.उषा तनपुरे, यांच्या बैठकीनंतर अनिता पोपळघट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. म्हणून अनिल कासार यांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट यांची बिनविरोध निवड झाली. अनिता दशरथ पोपळघट यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयासमोर एकच जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी केली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!