🕒 1 min read
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्हाचा लागला आहे. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
२९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान शासनाने १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २८ मे रोजी १० वीसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आलं. त्यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुली आहेत.
इयत्ता १०वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर २० टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना गुणपत्रक दिले जाईल जे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शाळांमधून दिले जाऊ शकते.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण
- चहल-कुलुदीपची धमाल मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ
- रिषभ पंतची जागा सांभाळणार टीम इंडियाचा ‘हा’ प्रमुख खेळाडू
- ‘मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल’ ; भाजपचा विश्वास
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
