मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्याा चौथ्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ पुन्हा वाया गेला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २ गडी गमावत १०१ धावांची मजल मारली होती.
या सामन्यात येणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे आयसीसीच्या नियोजन समितीवर अनेक क्रिकेट दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात आता भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागचेही नाव जोडले गेले आहे. सेहवागने त्याच्या नेहमीच्या शैलीत आयसीसीवर टिका केली आहे. त्याने ट्विट करत,’फलंदाजाना चांगली टायंमीग नाही मिळाली आणि आयसीसीला पण’ असे खोचक ट्विट सेहवागने केले आहे.
Batsman ko bhi Timing nahi mili dhang ki, aur ICC ko bhi#WTCFinal
— Virender Sehwag (@virendersehwag) June 21, 2021
आयसीसीने आयोजीत केलेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये साऊथहॅम्पटन येथे सुरु आहे. या सामन्याचा पहिला दिवस पुर्णपणे वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला तर तोही अपुऱ्या प्रकाशामुळे निर्धारीत वेळेच्या आधी थांबवण्यात आला. यानंतर तिसऱ्यादिवशीही तीच गत होती. अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ अधीच थांबवण्यात आला. दरम्यान पावसामुळे चौथ्या दिवशी एकही चेंडु न टाकता रद्द करावा लागला. यामुळे क्रिकेट रसिक नाराज आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराजाच्या हॅटट्रिकमुळे दक्षिण अफ्रिकेची वेस्ट इंडिजवर १५८ धावांनी मात
- डब्ल्युटीसी फायनल! ‘इंग्लंडमध्ये यापुढे महत्वाचे सामने नकोच’, पिटरसनने व्यक्त केला संताप
- कृषि अधिकाऱ्यांकडून निलंगा येथे पिकांची पाहणी; आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिल्या सूचना
- नेहरु भवन परिसरातील व्हीआयपी रस्ता मोकळा, मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई!
- खरीप हंगाम यशस्वी कण्यासाठी लातूरमध्ये कृषि संजीवनी मोहीमेला सुरुवात


