औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनासाठी सीपीएम प्रणाली लागू केल्याबद्दल शिक्षकसेनेने जिल्हा परिषद सीईओ व शिक्षण सभापती यांचा सत्कार करून ऋणाभार मानले.
गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षकांचे दरमहा वेतन अतिशय विलंबाने होत होते. यावर उपाय म्हणून शिक्षक सेनेच्या वतीने सीएमपी प्रणालीचा पर्याय सुचवून याची मागणी लावून धरण्यात आली होती.
अखेरीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी याबाबत सखोल अभ्यास करून उचललेल्या सकारात्मक पावलामुळे व शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्या सहकार्याने एप्रिल महिन्याचे वेतन या प्रणालीद्वारे नुकतेच शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यापूर्वीच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना केवळ आश्वासने देऊन खेळवत ठेवले होते. मात्र यावेळी सीईओ गोंदावले व सभापती गलांडे यांनी तातडीने कार्यवाही केल्याने शिक्षक सेनेच्या वतीने दोघांचे पुष्पगुच्छ व स्नेहवस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी या प्रणालीच्या कायमस्वरूपीच्या अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर कार्यपद्धती व जबाबदारीचे निश्चितीकरण करण्याची विनंती शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, अमोल एरंडे, सोमनाथ जगदाळे, कैलास मिसाळ, अमृत सोमवंशी, उद्धव बोचरे तसेच सुधाकर कापरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

