मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्याा चौथ्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे संपुर्ण दिवसाचा खेळ पुन्हा वाया गेला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २ गडी गमावत १०१ धावांची मजल मारली होती.
१८ जुनपासुन साउथहॅम्पटन येथे जागतीक कसोटी चॅम्पिनयशीप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाल्याने त्या दिवशी एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा न्युझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ६२ धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली. मात्र सलामीवीर रोहित शर्मा(३४) आणि शुभमन गील(२८) हे दोघे बाद झाल्यावर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव काही वेळ सावरला.
Day four of the #WTC21 Final has been abandoned due to persistent rain ⛈️#INDvNZ pic.twitter.com/QvKvzQCphG
— ICC (@ICC) June 21, 2021
पुजारा ५४ चेंडुत ८ धावा करुन बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सुत्रे हाती घेतली. आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत अधिक पडझड होऊ दिली नाही. यादरम्यात अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारीत वेळेपेक्षा आधी थांबवण्यात आला. यानंतर तिसऱ्या दिवशी न्युझीलंडच्या गोलंदाजानी पुनरागमन करत ३ बाद १४९ अशा चांगल्या स्थितीत असणाऱ्या भारतीय संघाला २१७ धावांत गुंडाळले. यानंतर न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात ७० धावांची दमदार सलामी दिली. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडने २ बाद १०१ धावांची मजल मारली होती. यानंतर चौथ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता फारच कमी आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृषि अधिकाऱ्यांकडून निलंगा येथे पिकांची पाहणी; आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिल्या सूचना
- मनाप्रमाणेच वसुंधरेलाही समृद्ध करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे औरंगाबादकरांना आवाहन!
- महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!
- विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश


