नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. नुकतेच एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी बँकेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. यामूळे काही फसवणूक करणारे फ्री गिफ्टच्या नावाखाली कस्टमर्सना लिंक पाठवता आणि तुमची खाजगी माहिती चोरतात.
Are you receiving these links in your inbox? Steer Clear! Clicking on these phishing links could lead to loss of your personal and confidential information. Stay alert. Think before you click!#ThinkBeforeYouClick #StayAlert #StaySafe #CyberSafety pic.twitter.com/S9WnN4wsGu
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 13, 2021
याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ट्वीट करत सांगितले की, तुमच्याही इनबॉक्समध्ये अशाप्रकारे लिंक्स येत आहेत का? तर या फिशिंग लिंक करण्यापासून सावध व्हा, यावर क्लिक केल्याने तुमची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते. सावध राहा आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
याआधीही वेळोवेळी एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना सावधानता बाळगण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अनेक लोक फसव्या मेसेजला बळी पडत आहेत, फसव्या लिंक, फसवे कॉल, आकर्षक ऑफरच्या नावाखाली नागरीकांना आर्थिक फटका बसतो. यामुळे अनेक वेळा सावधानतेचा इशारा म्हणून बँकेकडून मोबाईलवरील फसवे मेसेज, कॉल, ऑफर अथवा लिंकला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असे सांगण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप?
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय


