Share

औरंगाबादेत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय, जागेसाठी प्रस्ताव पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

Published On: 

औरंगाबाद : मिटमिटा परिसरात  विकसित करण्यात येणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१३) दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे वर्षा बंगल्यावर प्राणिसंग्रहालयाच्या जागेबाबत बैठक घेण्यात आली. मात्र अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.

यावेळी आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैयस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद शहराला वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना वेरूळ अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटन स्थळे ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाली पाहिजेत हे विचारात घेऊन प्राणिसंग्रहालयाचे काम झाले पाहिजे. औरंगाबाद मध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे.

सिद्धार्थ उद्यानात १४ एकर जागेवर प्राणिसंग्रहालय आहे. मात्र ही जागा कमी असल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मानांकनानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे ४० हेक्टर जागेवर प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. या प्राणिसंग्रहालयात सफारी पार्कसाठी अतिरिक्त ५० एकर जागा लागणार असल्याने मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. सफारी पार्कच्या जागेसह पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेला जमीन देण्यासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!