मुंबई: सध्या राज्यभरात वाईनविक्री निर्णयावरून भाजपने आक्रमक भमिका घेतली असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार( NCP president Sharad Pawar) यांनी वाईन निर्णय मागे घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil) यांनी वाईन शॉपवर अमृत शॉप लिहा असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
वाईन ही दारू नाही तर मग दारूच्या दुकानावर वाईन शॉप असे का लिहिले जाते? त्यामुळे अगोदर दारूच्या दुकानावरील ‘वाईन शॉप’ हे नाव काढून ‘अमृत शॉप’ लिहा. किंवा दुध शॉप म्हणा. सोडा म्हणा. कारण आम्ही पीत नाही, त्यामुळे आम्हाला समजावून सांगा. असा खोचक टोला लगावत हे सरकार गांजा सापडला की सुगंधी तंबाखू म्हणते. वाईनद्वारे शेतकऱ्यांना मदत होईल म्हणते. असे असेल तर दारूच्या दुकानावर वाईन शॉप का लिहिलेले असते? याचे उत्तर महाविकास सरकारने द्यावे. असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
दरम्यान शरद पवार यांनी वाईनविक्री (Wine sale decision) निर्णय मागे घेतल्यास आश्चर्य वाटू नये. असे म्हटले आहे. तसेच अगोदर वाईन आणि इतरसंबंधी फरक समजून घेणे आवश्यक आहे. तरी राज्यभर विरोध होत असेल तर सरकारने वेगळा निर्णय घेतल्यास माझा त्याला विरोध असणार नाही. असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- सर्वांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास; शेतीला सोयीसुविधा देणारा अर्थसंकल्प-रमेश कराड
- मुंबईत कॉंग्रेस – भाजप आमने सामने; प्रसाद लाड आणि पोलिसांमद्धे बाचाबाची
- दादाच्या शो मध्ये येणार “काचा बदाम” फेम भुबम ; व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेत
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ
- विराट कोहलीच्या खास खेळाडूने उघड केले गुपित, सांगितले आयपीएलच्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

