🕒 1 min read
मुंबई : आयपीएल अनेक प्रतिभाशाली खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळायची संधी देत असते. यात बरेच खेळाडू हालाख्याच्या परिस्तिथीतून येत असतात. आयपीएलमध्ये खेळल्यानंतर फ्रॅंचाईस त्यांना चांगले मानधन देते आणि त्याच्या खेळासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही याचा फायदा होत असतो. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे मोहंमद सिराज आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
मोहंमद सिराजने नुकतेच आरसीबीसाठी पॉडकास्टमध्ये बोलताना खुलासा केला आहे. त्याला मिळालेल्या पहिल्या कमाईतुन त्याने काय घेतले हे सांगताना तो म्हणाला ” मी पहिली गोष्ट म्हणजे आयफोन ७ प्लस विकत घेतला आणि मग मी माझ्या पहिल्या आयपीएलच्या कमाईने सेकंड हँड कोरोला कार खरेदी केली. तेव्हा गाडी आवश्यक होती. आयपीएल खेळाडूंकडे कार असावीच. मी कधीपर्यंत माझ्या प्लॅटिनावर सराव करायला गेलो असतो. मात्र, तेव्हा मला गाडी कशी चालवायची हे कळत नव्हते. माझ्या मामाच्या मुलाला गाडी कशी चालवायची हे माहीत होते. त्यामुळे जेव्हाही मला बाहेर जावं लागायचं तेव्हा मी त्याला फोन करायचो.”
सिराजने पुढे अजून एक खुलासा केला की त्याच्या कारमध्ये एसी नव्हता. त्यामुळे तो खिडकी उघडून गाडीत बसायचा आणि जाताना लोक त्याला ओळखायचे. त्याने संबंधित एक किस्साही सांगितला. सिराज म्हणाला, “एकदा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. नेहमीप्रमाणे गाडीत एसी नसल्याने मी खिडकी उघडून बसलो होतो. मग काही लोकांनी मला ओळखले आणि सिराज-सिराज म्हणत ओरडू लागले. ऊन जास्त असल्याने खिडकी बंद करता येत नव्हती. तेव्हा मजबुरी होती. मात्र, पुढच्या वर्षी मी एक मर्सिडीज घेतली.” सिराज सध्या आरसीबीचा भाग आहे. त्याला रिटेन केले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटमधून अटक, काय आहे नेमकं प्रकरण
- “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा
- सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब लवकरच-यशोमती ठाकूर
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये लागणार क्रीडा मंत्र्यावर बोली; जाणून घ्या कोण आहे हा मंत्री
- ईएसआयसीच्या रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची तातडीने भरती करणार-राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
