🕒 1 min read
मुंबई : सोशल मीडियावर सध्या “काचा बादाम” हे गाणे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सामान्य जनतेसोबत मोठे मोठे सेलेब्रिटी सुद्धा या गाण्यावर ठेका धरत आहे. या व्हायरल गाण्याचे गायक पश्चिम बंगालमधील भुबम हे आहेत. ते तुटलेले सामान घेऊन कच्चे शेंगदाणे विकतात. तेच विकताना ते हे गाणे म्हणतात. आता त्यांची प्रसिद्धी इतकी झाली आहे कि सौरव गांगुली याच्या शो मध्ये बोलवण्यात आले आहे.
सौरव गांगुली यांच्या “दादागिरी अनलिमिटेड” या शो मध्ये भुबमला बोलवण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे कि भुबम सोबतच्या एपिसोडचे शूट झाले आहे. ज्यामध्ये भुबमच्या काचा बदाम गाण्यावर दादानेही ताल धरली आहे. सौरव गांगुलीसोबत एका मंचावर उपस्तिथ राहणे अविश्वसनीय अनुभव असल्याचे भुबम म्हणाला आहे.
काचा बदाम हे गाणे इंस्टाग्राम रील वर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे पसरत आहे. याबाबत बोलताना गायक भुबम यांनी आनंद व्यक्त केला आहे. भुबमच्या काचा बादाम या बंगाली गाण्याचा अर्थ ” तुमचे तुटलेले सामान द्या मी त्याच्या बदल्यात तुम्हाला माझ्याकडील कच्चे शेंगदाणे देतो” असे आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या खास खेळाडूने उघड केले गुपित, सांगितले आयपीएलच्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केले?
- भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटमधून अटक, काय आहे नेमकं प्रकरण
- “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा
- सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब लवकरच-यशोमती ठाकूर
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये लागणार क्रीडा मंत्र्यावर बोली; जाणून घ्या कोण आहे हा मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
