Share

Vinayak Raut : “शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही”; विनायक राऊत आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

Vinayak Raut । मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे त्यांच्या या वाढदिवसावर दुःखाचे चावट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही टाळलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

विनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेशमधूनही शेकडो शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या पाठिशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत. मात्र शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. पक्षप्रमुख त्यांनी म्हटलेच पाहिजे, अशी आमची अपेक्षाही नाही. त्यांची जागा नेमकी काय आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.’अशा शुभेच्छा देताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन उल्लेख करण्याचे टाळले आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!