मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. शिवाय मलिक हे समीर यांच्या पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावरही निशाणा साधत आहे. यावर क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर देत मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे. ‘अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है’ अशी धमकी आव्हाड यांनी दिलीये.
या सर्व घडामोडीनंतर क्रांती रेडकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का? असा सवाल क्रांती यांनी विचारला आहे.
माननीय उद्धव ठाकरे साहेब @CMOMaharashtra पत्रास करण की … pic.twitter.com/0VJxURk5oi
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 28, 2021
क्रांती रेडकर यांचे पत्र जशाच्या तसे
‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे..
‘सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.. मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.’
‘आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.’
आपली बहिण
क्रांती रेडकर
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत; पेगाससवरून कॉंग्रेसचा टोला
- किरण गोसावीला अटक करण्यात पुणे पोलीस यशस्वी
- ‘..तर मी राजीनामा तर देईलच पण राजकारणातून संन्यासही घेईल’ : नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

