औरंगाबाद : शहराला खेटूनच असलेल्या सातारा परिसरातील डोंगरावर महिन्याभरातच पुन्हा आगीची घटना घडली. डोंगराच्या पायथ्या पासून वर ही आग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटना स्थळी दाखल होऊन आग विजवण्याचे प्रयत्न करीत आहे.
नीट वाट नसल्याने बंब या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. अग्निशमन विभागाचे 15 ते 20 कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी अचानक लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, हि आग लावली कि लागली अशी चर्चा सध्या नागरिक करत आहे.
मागच्या महिन्यात अज्ञाताने आग लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. उंच-सखल भागामुळे आग विझविण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, 2014 मध्येही अशीच आगीची घटना घडली होती. तेव्हा सातारा गावाजवळील डोंगराला लागलेल्या आगीत दोन हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. दोन दिवस ती आग धुमसत होती.
महत्वाच्या बातम्या
- … आणि म्हणे राष्ट्रवादी पुन्हा; जयंत पाटलांसमोरच कार्यकर्ते भिडल्यानंतर भाजपची टीका
- मोदी सरकार नरमलं; कृषी कायदे बंधनकारक नाहीत ! खुद्द मोदींची लोकसभेत माहिती
- ‘शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’
- धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामदास आठवले घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘पत्नी संजनाने मागितली असती तर आमदारकीही दिली असती’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

