मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, धुळ्यामधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जयंत पाटील कार्यक्रमासाठी आले असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही जोरदार हाणामारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भूषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. दोन्ही गटांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर हे प्रकरण हाणामारापर्यंत पोहोचलं. संवाद यात्रेमध्ये हाणामारीचा प्रसंग घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे.
हा प्रकार घडल्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘धुळ्यात जयंत पाटील यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा… आणि म्हणे राष्ट्रवादी पुन्हा…’ असा खोचक टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य नेते संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक गावांमध्ये पोहोचत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी कोरोना लस घेतली, तुम्ही पण घ्या’, सुनील केंद्रेकरांचे आवाहन
- मोदी सरकार नरमलं; कृषी कायदे बंधनकारक नाहीत ! खुद्द मोदींची लोकसभेत माहिती
- ‘शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’
- धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामदास आठवले घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘पत्नी संजनाने मागितली असती तर आमदारकीही दिली असती’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
