औरंगाबाद : एखाद्या महिलेने त्याच्या पतीशी वाद असल्यास त्याच्या विरोधात राजकारण केल्याचे मी बघितले आहे. मात्र, एखाद्या महिलेने आपल्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे केल्याचे मी बघितले नाही, अशी टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्नी तथा केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यावर केली आहे.
कन्नड तालुक्यातील झळकणाऱ्या बॅनरवरून संजना जाधव यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. पती जेलमध्ये असताना या महिलेने मुला विरोधात पॅनल टाकले. कशासाठी हा अट्टहास तर आमदारकीसाठी, तोंडाने मागितली असती तर देऊन टाकली असती. एवढा खटाटोप कशासाठी.’ अशी टीका त्यांनी केली. पुणे येथील कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी इशा झा यांच्यासह कन्नड शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, खासदार दानवे यांनी विधानसभेत मला पाडण्यासाठी तत्कालीन मंत्री लोणीकर यांच्या जावयाला उभे केले. त्यामुळे मी पडलो. निवडून आलेल्या आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस, तहसीलदार कोणीच काही ऐकत नाही. त्यामुळे खासदार दानवे यांनी माझेच नाही तर तालुक्याचेही नुकसान केले आहे.
राजकारण सोडून शांत जीवन जगण्यासाठी पुणे येथे गेलो, तेथेही चुकीचे गुन्हे नोंदवून, मला संपवण्याचा डाव रचला. मी आता परत राजकारणात येणार असून, जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांना पाडले नाही तर हर्षवर्धन नाव वापरणार नाही.’ अशी गर्जना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांनी चालत्या गाडीतून आमचे सदस्य ओढत नेले, भाजपचा आरोप
- ‘शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’
- शरद पवारांचा देखील कृषी कायद्यांना पाठींबा ? खुद्द नरेंद्र मोदींनीच दिला दाखला
- मला मूर्ख बनवून राम मंदिरासाठी देणगी घेतली,कॉंग्रेस आमदाराने मागितली मुस्लीम समुदायाची माफी
- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद; फडणवीसांचं आकडेवारीतून प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
