Share

चिंताजनक! उदगिरात २ दिवसात १८८ जण कोरोना पॉझिटिव्ह

Published On: 

लातूर : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे कहर दिसत आहे. उदगीर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये १८८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोना मुक्त झालेल्या १४ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी जळकोट येथील एका ८० वर्षीय बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उदगीरात सध्या ३६७ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

उदगीर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. परंतु विनाकारण सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. त्यातच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

परंतु याकडे काही नागरिकांचे दुर्लक्ष होत असून विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत. शिवाय शारीरिक अंतराचे पालन होताना दिसून येत नाही. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शुक्रवारी उदगीरात करण्यात आलेल्या कोविड – १९ चाचणीमध्ये एकूण ९४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला होता. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पुन्हा ९४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. दोन दिवसांमध्ये उदगीरात एकूण १८८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!