बीड: कोरोनाचा पादुर्भाव सध्या जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी जो तो आप आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. अशात आ.धस कसे मागे राहणार आ.सुरेश धस हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. पिककर्ज वाटपात बँक कर्मचारी हलगर्जीपणा करतात म्हणून त्यांचे पाय धूवून गांधीगिरी आंदोलन केले होते तर आता विना मास्क फिरणाऱ्यांच्या गळ्यात हार टाकून त्यास मास्क देत गांधीगिरी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना काळजी घेण्यासाठी हात जोडून विनंतीही केली.
आष्टी तालुक्यात कोरोनाचे रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढत असून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असताना आष्टी, कड्यात विनाकारण फिरणारांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण विनामास्क फिरत आहेत. शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचा आमदार सुरेश धस यांनी गांधीगिरी करत सत्कार करून मास्कचे वाटप केले. तसेच नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांना विनामास्क फिरणारांवर सक्त कारवाई करण्याचे सांगितले.
प्रत्येक व्यवसायिकाने नो मास्क नो एन्ट्री असे स्टिकर प्रत्येकाने आपल्या दुकानात दिसेल अशा सूचना देत दुकानदारांसहीत कामगार व येणारा ग्राहक यांना मास्क बंधनकारक आशा सूचनाही दिल्या. सद्यस्थितीत लॉकडाउन मधून आपल्याला शिथिलता मिळालेली आहे माञ तालुक्याची देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचा विषय होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खिलाडी कुमारला कोरोनाची लागण
- भीषण अपघात! कारने शिक्षक दांम्पत्यास नेले २०० फूट लांब फरफटत, दांम्पत्य जागीच ठार!
- ‘आनंद महिन्द्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळय़ा पिटण्याचा आनंद साजरा केला होता’
- दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई संघावर कोरोनाच सावट
- स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ‘ही’ सेवा आज राहणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
