🕒 1 min read
चेन्नई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.
आयपीएल 2021 सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान,आयपीएल सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्ससह चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टाफ मेंबर हे कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. यातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली आहे. पडिक्कलला आता इतर खेळाडूंपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. आरसीबीची पहिली मॅच ही 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.
देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.जबरदस्त फॉर्मात असलेल्या देवदत्तला कोरोना झाल्यानं आरसीबीच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. तो RCB च्या पहिल्या दोन मॅच खेळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ
विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलेन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम जंपा, काईल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, के एस भारत, सुयश प्रभुदेसाई डैनियल सैम्स, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या
- खिलाडी कुमारला कोरोनाची लागण
- भीषण अपघात! कारने शिक्षक दांम्पत्यास नेले २०० फूट लांब फरफटत, दांम्पत्य जागीच ठार!
- ‘आनंद महिन्द्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळय़ा पिटण्याचा आनंद साजरा केला होता’
- दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई संघावर कोरोनाच सावट
- स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ‘ही’ सेवा आज राहणार बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
