Share

चिंताजनक! औरंगाबादेत ४० जणांच्या ओमायक्रोन अहवालाची प्रतिक्षा..

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: ओमायक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. औरंगाबाद येथील एक व्यक्ती ओमायक्रोन पॉझिटिव्ह आली असून ती मुंबईत उपचार घेत आहे. तर इंग्लंडहून आलेल्या कुटुंबातील एक तरुणी देखील ओमायक्रोन पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची दररोज कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींचा अहवाल जिनोम सिक्वेन्सींगसाठी पुण्याला देखील पाठवले जात आहे. आता अशाच ४० जणांच्या अहवालाची औरंगाबाद प्रशासनाला प्रतिक्षा आहे.

कोरोनानंतर आलेले नवे संकट म्हणजे ओमायक्रॉन. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णाचा समावेश असल्याने औरंगाबाद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या भागातील रहिवाशांना सदर रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर इंग्लंड वरून आलेल्या कुटुंबातील एक सदस्य मुंबई या ठिकाणी उपचार घेत आहे.

याच ओमायक्रोनग्रस्त तरुणीच्या वडिलांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर कोरोना तपासणी केली जात आहे. आता अशाच प्रवाशांपैकी ४० प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांचे अहवाल पुण्याला पाठवण्यात आले आहेत. हे ४० प्रवासी ओमायक्रोन पॉझिटिव्ह आहेत की नाही हे लवकरच कळेल. आता या प्रवाशांचा अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!