🕒 1 min read
नवी दिल्ली : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारताने परदेशी भूमीवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. आता भारतीय संघाच्या नजरा दक्षिण आफ्रिका मालिकेवर आहेत कारण भारताने आतापर्यंत कधीही दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले नाही.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटोशूट करून घेतले आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी, विराट कोहली आणि कंपनी दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा विक्रम सुधारण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या दौऱ्यावर, भारत मालिका जिंकेल असे वाटत होते परंतु दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
https://www.instagram.com/p/CXxq1KyjOzS/?utm_source=ig_web_copy_link
गेल्या वेळी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फाफ डू प्लेसिस, एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, मोर्ने मॉर्केल आणि वर्नोन फिलेंड यांसारख्या बड्या खेळाडूंचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
