🕒 1 min read
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर एस टी कामगारांनी मोर्चा काढला. यावेळी एस टी कामगार फारच आक्रमक झाले होते. एस टी विलीनिकरणास शरद पवारांनी अडथळे आणले, असा आरोप कामगारांनी केला. यादरम्यान कामगार व पोलिसांमध्ये वाद घडत होते. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात हि घेतले आहे.
यावर भाजप प्रवक्ते अतुल भातखळकरांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. भातखळकरा म्हणाले, “एसटी चा संप न्यायालयामुळे मिटला, एका अर्थी कर्मचाऱ्यांच्या पदरात भरघोस फायदे पडले. नोकरीही सुरक्षित राहिली. परंतु या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे १०० हून अधिक आपल्या सहकाऱ्यांनी आत्महत्या केल्याची वेदना या कर्मचाऱ्यांना अजूनही सलते आहे. त्या ज्वालामुखीचा हा उद्रेक आहे.”
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केले आहे. शांततेच्या मार्गाने चर्चेची तयारी दर्शवली आहे. आपले आई वडील व मुलगी यांच्या सुरक्षेची काळजी मला वाटते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे
महत्वाच्या बातम्या :
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
IPL 2022: चेन्नई संघात मराठी भाषेचा बोलबाला; प्रॅक्टिस सेशन व्हिडीओतील गायकवाड – सोळंकीचे संभाषण व्हायरल!
शरद पवारांच्या निवासस्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; सिल्वर ओकवर फेकल्या चप्पला
शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीच आहे का ? तरुणाचं मुख्यमंत्र्यांना पत्र…
IPL 2022: चहलचा आरसीबीच्या खेळाडूंसोबत ‘कोल्ड वॉर’! सामन्यानंतर हातही मिळवला नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
