Share

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी फिट

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1–0 अशी आघाडी मिळवली आहे. भारतीय संघात ऐनवेळी गोलंदाजी विभागात बदल करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या पहिल्या डावात विकेट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.

सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच अष्टपैलू अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला अंतिम अकराच्या संघात खेळता आले नाही. मात्र आता एक आशादायी बातमी समोर येत असून त्यानुसार अक्षर पटेलने नेट्स मध्ये सराव केला आहे व दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अंतिम अकरामध्ये खेळू शकतो.

अक्षर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त झाला, तर तो शाहबाज नदीमची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “अक्षरच्या हाताला सामान्य दुखापत झाली होती. त्याने यापूर्वीही नेटमध्ये सराव केलेला आहे. येणाऱ्या काही दिवसातच तो पूर्ण तंदुरुस्त झालेला असेल व गोलंदाजी करणे देखील सुरू करेल. पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर खेळणार हे जवळजवळ निश्चित होते. मात्र अंतिम संघाबद्दलचा निर्णय कर्णधार व कोचवरच असेल.”

सामना संपल्यानंतर विराटने देखील नदीमबद्दल मत मांडले होते. विराटने स्पष्ट केले की जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांनी निर्माण केलेला दबाव शाहबाज नदीम व वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजी करताना टिकवून ठेवता आला नाही. त्यामुळे अक्षर पटेलला नदीमच्या जागी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!