🕒 1 min read
पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आले असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा होत आहे, या दरम्यानच मोरेंना पदावरून हटवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे.
आता वसंत मोरे यांना हटवून पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. याबाबत मनसेने अधिकृत पत्र देखील जाहीर केले. शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंनी मी मनसेतचं राहणार असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
म्हणाले, “पदावरुन हटवल्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे, तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
IPL 2022 : सेहवागनं रोहित शर्माला म्हटलं वडापाव? वीरूच्या ‘त्या’ ट्वीटवरून मुंबईकर पेटले!
वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबरांकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी
“जनतेने मतं देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली आता आपल्याला…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
“राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे” – वसंत मोरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
