Share

Women’s world cup : वेस्ट इंडीजचा न्यूझीलंडवर ३ धावांनी रोमहर्षक विजय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : महिला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज महीला संघाने न्यूझीलंड महीला संघाला ३ धावांनी पराभूत करत विश्वचषकाचा आगाज विजयाने केला आहे. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिज संघाने ५० षटकात ९ विकेट्स गमावून २५९ धावा केल्या तर न्यूझीलंड पुढे विजयासाठी २६० धावांचे मोठे लक्ष ठेवले होते.

परंतु या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची कोठी दमछाक झाली. या सामन्यात न्यूझीलंड संघाला फक्त २५६ धावाच करता आल्या. लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. सुझी बेट्स ३ धावा करून धावबाद झाली. त्यानंतर अमेलिया केरही १३ धावांवर पायचीत बाद झाली.

न्यूझीलंडकडून कर्णधार सोफिया डेवाइनने १२७ चेंडूत १०८ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. मधल्या फळीतील कॅटे मार्टिन आणि जेस या दोघींनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

तर प्रथम फलंदाजी वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात डीन्ड्रा डोट्टिन आणि हेले मॅथ्यू यांनी केली. संघाची धावसंख्या १२ असताना डीन्ड्राच्या स्वरुपात इंडिजला पहिला धक्का बसला. त्यानंतर कासिया नाइटही स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर हेले आणि स्टेफनी टेलरने संघाचा डाव सावरला. वेस्ट इंडिजकडून हेले मॅथ्यू हीने १२८ चेंडू ११९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिने १६ चौकार आणि १ षटकार मारला. तर स्टेफनी टेलरने ४७ चेंडूत ३० धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!