🕒 1 min read
काबुल : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काळजीवाहू सरकारची घोषणा केली आहे. सर्व पूर्णपणे पुरुषांच्या असलेल्या या सरकारच्या प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद हे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून असतील. तालिबानचे प्रमुख हिबातुल्ला अखुंदझदा हे सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असतील.
तालिबानने आता संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला असून पंजशीर खोरे हे शेवटपर्यंत लढले. मात्र, पाकिस्तानच्या मदतीने तालिबान्यांनी राहिलेला हा भाग देखील ताब्यात घेतला असून आता तालिबान्यांचे सरकार स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. सत्ता स्थापन करण्यासोबतच तालिबान्यांनी विकृत मनस्थिती देखील जगासमोर येत आहे. महिलांवर होणारे अत्याचार, दरोडे, नागरिकांचे कत्ले-आम सुरु आहे.
A Taliban official in an interview in Kabul on the importance of Hijab: “Do you buy a sliced melon or an intact melon???? . Of course the intact one. A woman without Hijab is like a sliced melon ????”pic.twitter.com/9lHpQnohyd
— Zia Shahreyar l ضیا شهریار (@ziashahreyar) September 6, 2021
अशातच, महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे एका मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तालिबानचा सदस्य हिजाब न घातलेल्या महिलांची तुलना कापलेल्या कलिंगडाशी करत आहे. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल होत असून नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही कापलेलं कलिंगड की पूर्ण कलिंगड खरेदी करता?, तसंच हिजाब न घातलेली स्त्री ही कापलेल्या कलिंगडासारखी आहे”, असं तालिबानी सदस्य व्हायरल व्हिडिओत सांगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

