मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट रिलीज येत्या 10 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच कंगनाने तिच्या थलायवी टीमसह अम्मांचे आशीर्वाद घेण्यासाठी चेन्नईतील दिवंगत जयललिता स्मारकाला भेट दिली होती.
https://www.instagram.com/p/CThaL4xCQks/?utm_medium=copy_link
सध्या कंगना थलायवीच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त असल्याचे दिसत आहे. ती चित्रपटाच्या प्रमोशनकडे अधिक भर देताना दिसत आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या कंगनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साऊथ इंडियन लुकमधील फोटो शेअर केले आहे. पिवळ्या रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्रीने केसात गजरादेखील माळला आहे. या लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
कंगणाचा थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचे संकट असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचाही तारीख पुढे ढकलली गेली. हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राणेंनी उगाच फुशारक्या मारू नयेत’, विनायक राऊतांचा पलटवार
- एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेचा शिवसेनेला टोला
- एट्रॉसिटी प्रकरण; करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
- भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हाला नाही; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर


