मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, पुरुषांना लोकलने प्रवास करण्यास अद्याप ही परवानगी दिलेली नाही.
अशातच आता, मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहानमुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यानुसार आता मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर आरसीएफ जवान तैनात असणार आहे. महिला प्रवाशासोबत लहान मुल आढळून आलं, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. त्यामुळे आता, मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहान मुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कंगनावरील कारवाई नियमानुसारचं’; न्यायालयाने फटकारल्यानंतरही महापौर ठाम!
- ‘माझा सामना, माझी मुलाखत’; हिंदुत्व असेल तर ते दिसत का नाही? : मनसे
- कोरोनाचा धोका वाढला : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
- या सरकारच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार; भाजपच्या माजी मंत्र्याचे भाकित!
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी


