🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या.
कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले हे सरकार आहे, अशी टीका भाजपचे नेते माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
प्रा.शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या.
पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीकडून वार, बघून घेऊ अशा प्रकारची वक्तव्य यापूर्वी कधी झाली नाहीत. मुख्यमंत्र्यांची वक्तव्य चिंताजनक आहेत, असे प्रा.शिंदे म्हणाले.
भाजपने आंदोलन केल्यानंतर दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले पण ते अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कोरोना काळात इतर राज्य सरकारांनी वेगवेगळी पॅकेज दिली पण महाराष्ट्र सरकारने काहीही दिले नाही. हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची भाजपची हिंमत नव्हती’
- ‘शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल नाहीत’
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंचा थेट इशारा
- भूमीला दुर्गामती चित्रपटातील लुक मुळे करावा लागत आहे ट्रोलर्सचा सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

